फलटण चौफेर दि २०
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव रावडी बु.ता फलटण गावा मध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीची जोपासना करीत भव्य-दिव्य स्वरूपात साजरी करण्यात आली. जयंती निमित्ताने ह.भ.प. अर्पिता आमराळे यांचे कीर्तन आयोजित करण्यात तसेच तब्बल १८० किमी असलेल्या किल्ले शिवनेरी वरून शिवज्योत धावत आणण्यात आली त्यामध्ये धावण्याची स्पर्धा आयोजित केली होती, यात राजेश मदने यांचा प्रथम क्रमांक आला ते २५ किमी धावले, द्वितीय करण मदने (१७किमी) व तृतीय सुमित भंडळकर (१५ किमी).सायंकाळी लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, भाषणे,पोवाडे,शिवगर्जना, मिरवणूक व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते