फलटण चौफेर दि २०
जिल्हयातील विविध भागातुन चोरी झालेल्या एकुण ८ मोटर सायकल चोरटा सराईत विक्रम रमेश सकट वय २७वर्षे रा. बेघर वस्ती सैदापुर कराड ता. कराड जि. सातारा याला मोठ्या शिताफीने मुसक्या आवळल्या. दिनांक 16 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील सो. त्याचे ठरले कारवाई प्रमाणे पोलीस उप निरीक्षक पतंग पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथक यांना मोटर सायकल चोरीच्या गुन्हयाबाबत मार्गदर्शन करुन पथकाचे दोन गट करुन कराड शहर तसेच उप नगरात गस्त करणेबाबत आदेशित केले होते.
सायकांळी ५.३०वाजताचे सुमारास सैदापुर परिसरा
त गस्त करीत असताना एक इसम संशयीत रित्या मोटर सायकल वर उभा असलेला दिसुन आला पोलीस उप निरीक्षक पतंग पाटील यांना त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने सदर इसमास ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्याचे ताब्यातील मोटर सायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपीस पोलीस ठाणेस आणुन पोलीस उप निरीक्षक पतंग पाटील सो. यांनी त्यांचे तपास कौशल्याचा वापर करुन डी. बी.लोकाभिमुखे विजयाचे कमांडर कडुन सातारा, साँली, कोल्हापुर जिल्हयातुन एकजुण 08 मोटर समूहे नामविक्रम रमेश सकट वय 27 वर्षे रा. बेघर वस्ती सैदापुर कराड ता. कराड जि. सातारा याचे ताब्यातुन जप्त केल्या असुन पुढील गुन्हे
उघड केले आहेत.
01) कराड शहर पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 164/2024 भादवि कलम 379 प्रमाणे (सातारा) 02) कराड शहर पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 1004/2023 भादवि कलम 379 प्रमाणे (सातारा)
03) कोरेगाव पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 55/2024 भादवि कलम 379 प्रमाणे (सातारा) (04) हुपरी ठाणे गुन्हा क्रमांक 09/2024 भादवि कलम 379 प्रमाणे (कोल्हापुर )
05 ) जयसिंगपुर ठाणे गुन्हा क्रमांक 43/2024 भादवि कलम 379 प्रमाणे (कोल्हापुर )
06) पुसेगाव पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 25/2024 भादवि कलम 379 प्रमाणे (सातारा) 07) विश्रामबाग पोलीस ठाणे
गुन्हा क्रमांक 12024 भादवि कलम 379 प्रमाणे (सांगली) 08) तळबीड टोल येथुन निवडणे एक आदेश (सातारा)
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक समीर शेख सो सातारा मा. अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल सो. सातारा मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर सो. व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील सो. कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उप निरीक्षक पतंग पाटील सो. सफौ रघुवीर देसाई, सफो संजय देवकुळे, पोलीस हवा. शशिकांत काळे, अमित पवार, पोलीस नाईक, कुलदिप कोळी, संतोष पाडळे, पो.शि. अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, महेश शिंदे, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ यांनी केली