सातारा दि.२ (जिमाका): सातारा जिल्ह्यातील माजी सैनिकांना कळविण्यात येते की, पुणे महानगरपालिका, पुणे येथे कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)(श्रेणी-३) या पदासाठी जागा भरावयाच्या आहेत. सदर भरतीची प्रक्रिया ऑनलाइन पध्दतीने असल्यामुळे पुणे महानगरपालिका, पुणे ची वेबसाईट www.pmc.gov.in वर दिनांक ५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत अर्ज करावेत. सबब माजी सैनिकांनी या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी , सातारा यांनी केले आहे.