साखरवाडी गणेश पवार:- फलटण तालुक्यातील ग्रामीण भागातील एका शाळेतील दोन अल्पवयीन मुलीवर त्याच शाळेतील क्रीडा शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात संबंधित शिक्षकाच्या विरोधात विनयभंग व पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फलटण तालुक्यातील फलटण ग्रामीण पोलिस हद्दीतील एका गावामधील शालेय शिक्षण घेणाऱ्या दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी संशयीत क्रीडा शिक्षक तुषार एकनाथ मोहिते(वय ५० रा ७ सर्कल साखरवाडी ता फलटण) या शिक्षकाविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात विनयभंग व पॉक्सो प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी अत्याचार झालेल्या एका अल्पवयीन मुलीने काही दिवसापूर्वी तीच्यावर संशयित क्रीडाशिक्षक मोहिते याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना तिच्या मावस भावास सांगितली होती. याबाबत संबंधित अल्पवयीन मुलीच्या मावस भावाने दिनांक ८ फेब्रुवारी २०२४ रोजी ऑनलाइन ई कम्प्लेंट दाखल केली होती. दाखल करण्यात आलेल्या ऑनलाइन ई कम्प्लेंट मध्ये दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची नोंद करण्यात आली होती. ऑनलाइन ई कम्प्लेंट दाखल होताच संशयीत क्रीडा शिक्षक तुषार मोहिते हा शिक्षक फरार झाला आहे
दाखल ऑनलाइन ई कम्प्लेंट च्या अनुशंगाने याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात दिनांक १० फेब्रुवारी २०२४ रोजी तक्रार दाखल करण्यात आली असून यामध्ये एका शाळेत इयत्ता १० वी मध्ये शिकत असलेली अल्पवयीन मुलीवर डिसेंबर २०२३(नक्की तारीख नमूद नाही) सायंकाळी ५ ते ६ दरम्यान शाळेच्या आवरामधील जिमच्या खोलीमध्ये व्यायाम करण्यासाठी गेली असता पी. टी शिक्षक तुषार मोहिते याने लैंगिक अत्याचार केला. तसेच याच शाळेमधील ११ वी मध्ये शिकत असणाऱ्या अल्पवयीन मुलीवर डिसेंबर २०२३ मध्येच (नक्की तारीख नमूद नाही) वडुज ता.खटाव येथील जिल्हास्तरीय खेळाच्या स्पर्धा संपल्यानंतर पी. टी शिक्षक तुषार मोहिते याने त्याच्या चारचाकी मधून ईतर विद्यार्थिनींना त्यांच्या घरी सोडल्यानंतर रस्त्यामध्ये लैंगिक अत्याचार केला. या घटनेतील दोन्ही मुलींनी लैंगिक अत्याचार झाल्याची बाब घटना घडल्यानंतर कोणासही सांगितली नव्हती.
संशयीत क्रीडा शिक्षक तुषार मोहिते याने याआधी अनेक अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची शक्यता असून या प्रकरणी अत्याचार झालेल्या मुलींवर व तिच्या कुटुंबीयांवर दबाब टाकला जात असल्याची माहिती मिळत आहे. सदर प्रकरणाचा तपास एका महिला पोलिस अधिकाऱ्याकडे देण्याची आवश्यकता आहे.
ज्या ज्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे अशा मुली व पालकांनी कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता ग्रामीण पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन फलटण ग्रामीण पो नि सुनील महाडिक यांनी केले आहे