फलटण चौफेर दि १२ - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सातारा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी नुकत्याच जाहीर करण्यात आल्या. यावेळी फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेच्या अध्यक्षपदी राजुरी ता. फलटण येथील जयकुमार इंगळे तर फलटण शहराध्यक्षपदी प्रमोद निंबाळकर यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्हा अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा कार्याध्यक्ष गेनूजी कदम, सरचिटणीस श्रीनिवास शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.