फलटण चौफेर दि ११
फलटण येथील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ प्रसाद जोशी यांनी माडकर वस्ती (जिंती) ता फलटण येथील जय हनुमान तरुण मंडळाकडून उभारणी सुरू असलेल्या हनुमान मंदिराला भेट देऊन मंडळाकडून उभारण्यात असलेल्या नवीन मंदिरा बाबत तसेच दरवर्षी हनुमान जयंती निमित्त मंडळाकडून आयोजित केल्या जाणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमाबाबत मंडळाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या यावेळी मंडळातर्फे डॉ प्रसाद जोशी यांचा शाल, पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला