Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

श्री दत्त इंडीयाचे ६.लाख ५० हजार मे. टन ऊस गाळप पूर्ण : प्रतिटन ३१०० रुपये प्रमाणे १५५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा-अजितराव जगताप

 


     फलटण दि. ८ : श्री दत्त इंडीया प्रा. लि., साखरवाडी ता. फलटण या साखर कारखान्याने सन २०२३ - २४ च्या चालू वर्षीच्या गळीत हंगामात दि. ६ फेब्रुवारी अखेर ६ लाख ४३ हजार ६५१ मे. टन ऊस गाळप केले असून त्यापैकी दि. १५ जानेवारी अखेर गाळपास आलेल्या ऊसाला प्रतिटन ३१०० रुपये प्रमाणे १५५ कोटी ४७ लाख १५ हजार ५९३ रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याची माहिती कारखान्याचे प्रशासन अधिकारी अजितराव जगताप यांनी दिली आहे. यावेळी जनरल मॅनेजर फायनान्स अमोल शिंदे, केन मॅनेजर सदानंद पाटील, शेतकी अधिकारी बागनवर, युनियन जनरल सेक्रेटरी राजेंद्र भोसले उपस्थित होते.


       यावर्षीच्या गळीत हंगामात दि. १५ जानेवारी अखेर गाळपास आलेल्या ५ लाख १ हजार ५२१.०४६ मे. टन ऊसाल प्रतिटन ३१०० रुपये प्रमाणे १५५ कोटी ४७ लाख १५ हजार ५९३ रुपये ७ हजार ४२९ ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आल्याची माहिती प्रशासन अधिकारी अजितराव जगताप यांनी दिली आहे. 

   दरम्यान गळीत हंगाम अद्याप वेगात सुरु असून मंगळवार दि. ६ फेब्रुवारी अखेर ६ लाख ४३ हजार ६५१ मे. टन ऊसाचे गाळप झाले असून यावर्षी ८ लाख मे. टनाहुन अधिक गाळपाचे उद्दीष्ट असून ते निश्चित पूर्ण होईल अशी अपेक्षा प्रशासन अधिकारी जगताप यांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.