फलटण चौफेर दि २० :
१९ फेब्रुवारी २०२४ रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी साजरी होत आहे. फलटण येथे पुनर्वसन गोळेगाव मध्ये शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक मा. गायकवाड साहेब,पोलीस उपनिरीक्षक मा. शिंदे साहेब,पोलीस उपनिरीक्षक मा. दातीर साहेब, तसेच हेड कॉन्स्टेबल मा. घोरपडे साहेब,हेड कॉन्स्टेबल मा. जगदाळे साहेब,हेड कॉन्स्टेबल मा. बडे साहेब,हेड कॉन्स्टेबल मा. सजणे साहेब, यांची उपस्थिती लाभली.यावेळी सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, यावेळी गोळेगाव मधील सर्व शिवप्रेमी, गावातील सर्व ग्रामस्थ याठिकाणी उपस्थित होते. पद्मावती नवतरूण क्रिडा मंडळातील मुलांनी किल्ले सज्जनगड सातारा येथून शिवज्योत घेऊन गोळेगाव पर्यंतचा प्रवास केला, यावेळी गोळेगाव मधील सर्व शिवप्रेमींचे पोलीसअधिकारी वर्ग यांनी कौतुक केले आणि सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ,महिला मंडळ तसेच तरुण वर्ग यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.