फलटण चौफेर दि ४ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था केंद्र फलटण मार्फत देण्यात येणारा यावर्षीचा शारदा पुरस्कार दहिवडी येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. पद्माताई कुबेर यांना मोठ्या दिमाखात समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.
कै. सत्यभामाबाई लेले यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा शारदा पुरस्कार आयोजन नवलबाई मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते.
यावेळी डॉ.हेमलता गुळवणी, प्रा.उषाताई कुलकर्णी, पुणे तसेच महाराष्ट्र शासनाचा वृक्ष मित्र पुरस्कार सन्मानित डॉ. महेश बर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी केंद्रप्रमुख श्री. विजय ताथवडकर यांनी सर्वांचे स्वागत करून या संस्थेमार्फत बारा महिने चांगले कार्यक्रम दर्जेदार राबवत जातात असे सांगितले. आज आपणास दहिवडी सारख्या ग्रामीण भागात चांगले काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला पुरस्कार देताना खूप आनंद वाटतो असे सांगितले.
उषाताई कुलकर्णी यांनी मी जरी सध्या पुणे ते वास्तव्य असले तरी या संस्थेच्या सुरुवातीची बारा वर्षे कार्यकारणी उत्तम काम केले. या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांनी संस्थेत रुपये दहा हजार रुपये देणगी जाहीर केली. डॉ। महेश बर्वे यांनी माझ्या वडिलांच्या आठवणीसाठी मी वृक्षांचे वाटप घरोघरी केली वाढदिवस लग्न समारंभ बाळंतीण यांना जागेवर जाऊन वृक्ष वाटप केली व त्याचे जतन करण्याचे आवाहन केले. समाजात आज पर्यावरण व वृक्षाची जागृती झाल्याची झाल्याची समाधान वाटते. असे त्यांनी सांगितले.
यावेळी डॉक्टर हेमलता गुळवणी आणि या संस्थेच्या उल्लेखनीय कार्य करत असल्याचे सांगितले. प्ररंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सौ। पद्माताई कुबेर व डॉ. महेश बर्वे यांना शाल श्रीफळ, बुके व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, सभासद, निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचाल निखिल केसकर व डॉ.माधुरी दाणी यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय अनिरुद्ध रानडे, नंदकुमार केसकर , स्वानंद जोशी यांनी करून दिला.