फलटण चौफेर दि ४
काळज राष्ट्रवादी चे माजी उपसरपंच सचिन गाढवे पाटील , डॉ गोरख आप्पा गाढवे पाटील , व त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजप मध्ये प्रवेश.. यावेळी बोलताना खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर म्हणाले की फलटण तालुक्यामध्ये परिवर्तनाची नांदी सुरू झाली असून या तालुक्याच्या विकासासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे पाणी नोकरी , रस्ते , पायाभूत सुविधा यासाठी निधी उपलब्ध करून आणला आहे . फलटण हे राज्यामध्ये विकासाचे मॉडेल म्हणुन बघितले जाईल .आज राष्ट्रवादी व इतर पक्षाचे अनेक कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करीत आहे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून आज भाजप मध्ये प्रवेश होत आहेत मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या कोणत्याही कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. यावेळी युवा नेते धनंजय दादा साळुंखे पाटील, जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील, गटनेते अशोकराव जाधव, सिराज भाई शेख , राजेंद्र काकडे , वसीम इनामदार, हरि गोपणर विशाल नलवडे,लतीफभाई तांबोळी समीर धुमाळ, राहुल शहा , दादासो माने , नवनाथ गाढवे पाटील उपस्थित होते