फलटण चौफेर दि १
निंभोरे तालुका फलटण गावच्या सरपंच कांचन निंबाळकर यांच्यावर जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून फलटण ग्रामीण पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार,
फिर्यादी धीरज गौतम जगताप वय ३२ रा साखरवाडी ता फलटण यांना सरपंच कांचन निंबाळकर यांनी निंभोरे गावच्या हद्दीत नीरा उजवा कालवा लगत दि ३१ रोजी रात्री ९.४० वाजण्याच्या सुमारास फिर्यादीला 'तू येथे ट्रॅक्टर घेऊन का आलास,तू इथली माती उचलायची नाही असे म्हणून जातीवरून शिवीगाळ,दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास उपविभागीय अधिकारी राहुल धस करीत आहेत