फलटण चौफेर दि १
साखरवाडी ता फलटण गावातील बाजारपेठेमधून जाणारा व अतिशय दयनीय अवस्था झालेल्या बहुप्रतिक्षेत रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाला अखेर फलटण कोरेगावचे आमदार दीपकराव चव्हाण यांनी २५१५ अंतर्गत मंजुरी दिली असून तलाठी कार्यालय ते काळुबाई मंदिर चौक या रस्त्याला ३० लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार दिपकराव चव्हाण यांनी दिली त्यामुळे अतिशय दयनीय अवस्था झालेल्या या रस्त्यामुळे धूळ व खड्ड्यांमधून नागरिकांना व व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार आहे
सुमारे १८ वर्षांपूर्वी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते मात्र यानंतर मागील १८ वर्षात या रस्त्याची एकदाही डागडुजी न झाल्याने या रस्त्याची प्रचंड मोठ्या प्रमाणात दयनीय अवस्था झाली होती याबाबत "दैनिक पुढारीने" वारंवार वृत्ताच्या माध्यमातून आवाज उठवला होता याची दखल घेत साखरवाडीतील राजे गटाच्या कार्यकर्त्यांनी नागपूर येथील अधिवेशन काळात विधान परिषदेचे माजी सभापती विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना भेटून या रस्ताच्या दुरुस्ती बाबत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती त्यावेळी श्रीमंत रामराजे यांनी सदर रस्ता लवकरच डांबरीकरण करू असे आश्वासन यावेळी दिले होते त्यानुसार आमदार दिपकराव चव्हाण यांनी २५१५ अंतर्गत तीस लाख रुपये मंजूर केले असून लवकरच या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू होणार असल्याचे सांगितले यामुळे नागरिक व व्यापाऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे