फलटण चौफेर दि १४
मराठा आरक्षण अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. या मागणीसाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा आंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला बसले आहेत. याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती; याला प्रतिसाद म्हणून फलटण तालुक्यातील साखरवाडी ,सुरवडी,खामगाव गावांनी कडकडीत बंद पाळून उस्फुर्त प्रतिसाद दिला