फलटण चौफेर दि १४
जेजुरी ता पुरंदर गावाच्या हद्दीतून बल्लाळेश्वर मंदिराशेजारी असणाऱ्या वीट भट्टी येथील टिपर च्या दोन बॅटऱ्या चोरी झाल्याची झाल्याची घटना दिनांक १२ रोजी घडली होती यावर निरा पोलिसांनी निरा गावाच्या हद्दीतून दोन संशयितांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्या ताब्यातून दोन बॅटऱ्या व एका मोटर सायकल सहित ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून संशयित अक्षय दिलीप शेवाळे वय २३ राहणार जुनी जेजुरी तालुका पुरंदर व तेजाब जमीर खान वय ३५ रा नीरा यांना अटक केली आहे सदरची कारवाई जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली नीरा पोलीस चौकीचे सहाय्यक फौजदार मोकाशी, पोलीस हवालदार राजेंद्र भापकर, पोलीस नाईक हरिश्चंद्र करे ,पोलीस हवालदार नावडकर, पोलीस हवालदार, मदने पोलीस कॉन्स्टेबल निलेश जाधव यांनी केली। आहे