फलटण चौफेर दि १३ : मायणी पोलिस दूरक्षेत्र परिसरामध्ये अचानक
लागलेल्या आगी मध्ये अकरा गाड्या जळून खाक झाल्या आहेत पोलिसांनी कारवाई केलेल्या विविध केस च्या माध्यमातून मिळालेल्या गाड्या ह्या आगी मध्ये जळून खाक झाल्या असून आग विजवण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न केले व त्यांनी आग आटोक्यात आणली परंतु हि आग लागण्यामागचे कारण अद्यापही अस्पष्टच आहे.
आग स्पारकिंग मुळे लागली नसून आगीचे स्पष्टिकरण पोलीसांनी द्यावे सदर घटनेची डि वाया एस पी मॅडम यांनी चौकशी करावी अशी मागणी मायणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे मायणी गटाचे विभाग प्रमुख विशाल चव्हाण यांनी केली आहे.
सदरची घटना मायणी पोलिस दूरक्षेत्र परिसरामध्येच घडल्यामुळे नागरिक असुरक्षित असल्याचा प्रश्न निर्माण झाला असून नागरीक असुरक्षित असल्याची चर्चा दबक्या आवाजात नागरिक करत आहेत