फलटण चौफेर दि २९
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला.महाविद्यालय विकास समिती सदस्य, मा.डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महाविद्यालय विकास समिती सदस्य तथा फलटण एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार मा.श्री.हेमंत रानडे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. नरेंद्र नार्वे उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली व त्यानंतर राष्ट्रगीत व ध्वजगीत गायन करण्यात आले. राष्ट्रध्वजाशी व देशाशी एकनिष्ठ राहण्याबद्दल शपथ घेण्यात आली.
यावेळी मान्यवरांसह महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.