साखरवाडी पुढारी वृत्तसेवा
मराठा आरक्षण व इतर मागण्यांबाबत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाची आज नवी मुंबई वाशी येथे विजयी सांगता झाली मराठा समाजाला आरक्षण व इतर मागण्या बाबत राज्य शासनाने याबाबत अध्यादेश काढला त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा समाजाकडून आनंद उत्सव साजरा केला जात असून त्यानुसार सुरवडी ता फलटण येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात गावातील तरुण, महिला, आबालवृद्ध यांनी एकत्रित येत गुलाल उधळून, फटाके फोडून, हलगीच्या तालावर मिरवणूक काढून जिलेबी व पेढ्याचे वाटप करत जल्लोष साजरा केला यावेळी' जय भवानी जय शिवाजी', 'एक मराठा लाख मराठा' 'मनोज जरांगे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है' अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथून लाखोंच्या संख्येने मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मुंबईच्या दिशेने मोर्चा काढला होता हा लाखोंचा मोर्चा नवी मुंबई वाशी येथे आल्यानंतर राज्य शासनाकडून मराठा समाजाला आरक्षण व इतर मागण्यांबाबत त्वरित अध्यादेश काढण्यात आला यावर मनोज जरांगे यांनी सुधारणा सुचवल्याने सुधारित अध्यादेश रात्री काढण्यात आला यावर आज सकाळी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे पाटील व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विराट विजयी सभेचे आयोजन झाले या सभेत मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचे सांगून मनोज जरांगे पाटील यांनी या विजयी सभेने या आंदोलनाची सांगता केली या विजयाचा जल्लोष संपूर्ण महाराष्ट्रभर सकाळ पासून फटाके फोडून,पेढे वाटून व गुलाल उधळून करण्यात आला त्यानुसार सुरवडी तालुका फलटण येथे छत्रपती संभाजी महाराज चौकात गावातील तरुण ,आबालवृद्ध,महिला यांनी फटाके फोडून जिलेबी व पेढ्यांचे वाटप करून राज्य शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले. विशेष म्हणजे गावात मागील एक महिन्यापासून डीजे बंदी असून या डीजे बंदीचे तंतोतंत पालन करून पारंपारिक हलगीच्या ठेक्यात जल्लोष करण्यात आला