Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राज्यस्तरीय माणगंगा साहित्यप्रेमी गौरव पुरस्कारासाठी प्रकाशित पुस्तके पाठवण्याचे आवाहन

 



फलटण चौफेर दि २७

 साहित्य क्षेत्रात नवनवे उपक्रम राबवून आपला स्वतंत्र ठसा उमटवून नव्या जुन्या साहित्यिकांचा सुसंवाद साधणारी साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन फलटण जिल्हा सातारा ही आगळीवेगळी साहित्य संस्था आहे. या साहित्य संस्थेच्या वतीने कविसंमेलन,साहित्य संमेलन, प्रकाशित पुस्तके पुरस्कार, साहित्यिक आपल्या भेटीला, साहित्यिक संवाद, पुस्तक प्रकाशन, साहित्यिक कार्यशाळा व लिहीत्या हातांना बळ देणे असे कार्यक्रम राबवले जातात. साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी  प्रकाशित पुस्तकांसाठी मानाचा 'राज्यस्तरीय माणगंगा साहित्यप्रेमी गौरव पुरस्कार'देऊन गौरविण्यात येते. हे सहावे वर्ष आहे. यावर्षीही प्रकाशित पुस्तके पाठवण्याचे आवाहन अध्यक्ष ताराचंद्र आवळे यांनी केले आहे. यासाठी  जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या काळात प्रकाशित झालेली कादंबरी, कथासंग्रह, काव्यसंग्रह, चरित्र, आत्मचरित्र व संपादित पुस्तके पुरस्कारासाठी दिनांक 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत पाठवावीत. प्रत्येक पुस्तक प्रकारातून एका साहित्य कृतीला राज्यस्तरीय माणगंगा साहित्यप्रेमी गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, रोप व पुस्तके असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तरी जास्तीत जास्त साहित्यिकांनी पुस्तके पाठवून आपला सहभाग नोंदवावा. प्रत्येक सहभागी साहित्य कृतीस ऑनलाईन सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येईल. प्रकाशित पुस्तके प्रा.सौ. सुरेखा ताराचंद्र आवळे 

कोणार्क रेसिडेन्सी सदनिका क्र.6 गोळीबार मैदान लक्ष्मीनगर फलटण तालुका फलटण जिल्हा सातारा

 पिन- 415523 संपर्क भ्रमणध्वनी- 8237241322.या पत्त्यावर पाठवावीत.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.