प्रतिनिधी. धिरज जगताप ग्रामपंचायत खामगाव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला ग्रामपंचायतचे सरपंच ताराबाई तानाजी ढगारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळेस कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामसेवक डी.डी निंबाळकर यांनी केले व खामगाव ग्रामपंचायतच्या वतीने साखरवाडी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक संजय बोडरे सर दादाजी कोंडदेव पुरस्कार विजेते यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच खामगाव व साखरवाडी मधील व साखरवाडी विद्यालयामध्ये शिकत असलेले खो-खो खेळाडू, वेदिका जाडकर,प्रणोती कुचेकर, तेजस्विनी कुचेकर. साक्षी गोळे,उमेरा पठाण, तनुजा भुजबळ,दिशा बोंद्रे,श्रावणी तावरे इशिता लांडगे. ऋषिकेश खराडे कार्तिक शिंदे अथर्व गायकवाड गौरव भोसले शिवम खलाटे अनंद रासकर सार्थक गायकवाड अथर्व जाधव सन्मानचिन्ह शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्याचबरोबर अमर भीम तरुण मंडळ खामगाव यांच्या तर्फे प्राथमिक शाळेस संविधानाची एक प्रत दिली तसेच प्रत्येक विद्यार्थ्यास संविधानाच्या उद्देशिकेची प्रत आणि वही आणि पेन वाटप करण्यात आले. व त्यावेळी संजय बोडरे सर खामगाव मधील खो खो खेळाडू राष्ट्रीय पातळीवर आपली कामगिरी बजावतील असा विश्वास व्यक्त केले तसेच साखरवाडी प्रमाणे खामगाव गावाचा खो खो खेळा मध्ये नावलौकिक मिळवा व जास्तीत जास्त खेळाडूंना बोडरे सर यांनी संधी द्यावी असे मत खामगाव चे सरपंच सौ ताराबाई ढगारे यांनी मांडले या कार्यक्रमाच्या वेळी खामगाव गावचे ग्रामसेवक डी.डी निंबाळकर व सरपंच ताराबाई ढगारे व उपसरपंच गणपत बोडरे व माजी सरपंच माधुरी जाडकर व शकुंतला वैद्य व ग्रामपंचायत सदस्य हिरामण चाबुकस्वार,राहुल सोनटक्के,मयुरी भोसले मंजुश्री कुचेकर,किसनराव झेंडे व खामगाव गावातील ज्येष्ठ नागरिक नितीन जगताप,हिंदुराव वारे ,प्रदीप जाडकर व अंगणवाडी सेविका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आशा सेविका आरोग्य कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते