विडणी (योगेश निकाळजे) - विडणीतील अल्पावधीतच खवैय्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या हॉटेल आईची माया या हॉटेलचा प्रथम वर्धापनदिनानिमित्त ग्राहकांसाठी खास फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे.
फलटण -पंढरपूर महामार्गावरील विडणी येथील नवीन उड्डाणपुला जवळच असलेल्या व अल्पावधीतच खवैय्य ग्राहकांच्या पसंतीस पडलेल्या हॉटेल आईची माया या हॉटेलचा शनिवार दि.२७ जानेवारी रोजी प्रथम वर्धापन साजरा होत असून यानिमित्ताने ग्राहकांसाठी २८जानेवारी (रविवारी)पासून दहा दिवस खास भव्य फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये स्पेशल व्हेज व चिकनची गावरान मेजवाणी ठेवण्यात आली आहे, स्पेशल चिकनमध्ये एकूण ७८पदार्थ व स्पेशल व्हेजमध्ये ७६ पदार्थ असे एकूण १५४ पदार्थांचा आस्वाद ग्राहकांना मिळणार असून यासाठी मात्र ग्राहकांना फक्त ३०० रुपयांचे कूपन घ्यावे लागणार आहे तर ५ ते १० वयाच्या मुलांना फक्त १५० रुपयांचे कूपन राहणार असल्याने इतक्या स्वस्त दरात इतके पदार्थ ग्राहकांना खायला मिळणार आहेत,या भव्य फूड फेस्टिवलचा आस्वाद ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन हॉटेलचे मालक संजय जाधव व सौ.उज्वला जाधव यांनी केले आहे.
हॉटेलच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्ताने ग्राहकांसाठी फूड फेस्टिवलसह मनोरंजनासाठी शनिवार दि.२७ रोजी सायंकाळी ७ वाजता हॉटेलसमोर रेखा देवकाते पाटील प्रस्तूत गावरान मेवा ऑकेस्ट्रा हा कार्यक्रम होणार आहे तरी या कार्यक्रमासही उपस्थित राहण्याचे आवाहनही जाधव यांनी केले आहे.