फलटण चौफेर दि २५
वडिलोपार्जित जमीनीचे वाटणी पत्रानुसार सातबारा उता-यावर नोंद करण्यासाठी १३ हजाराची ची लाच मागितल्या प्रकरणी संशयित मंडलाधिकारी जितेंद्र बाळासाहेब कोंडके, वय ५३ वर्षे, कर्मचारी मंडळ अधिकारी, फलटण भाग, फलटण जि. सातारा वर्ग-३, रा. पुजारी कॉलनी, फलटण व तलाठी रोमा यशवंत कदम, वय-३१ वर्षे, पद-तलाठी सजा फलटण, वर्ग-३, रा. मलठण ता. फलटण यांनी स्वतःसाठी ३ हजार रुपये व मंडलाधिकारी कोंडके यांचेसाठी १० हजार रुपये अशी एकुण १३ हजार रुपयांची लाच सर्कल कार्यालय फलटण येथे स्वीकारताना लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले