Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय फलटण युवा महोत्सव उद्घाटन समारंभ संपन्न.

 



फलटण चौफेर दि २५

फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय फलटण येथे युवा महोत्सव 2024 चे उद्घाटन फलटण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी माननीय श्री सचिन ढोले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत व फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य भोजराज नाईक निंबाळकर शिरीष दोशी पार्श्वनाथ राजवैद्य हेमंत रानडे फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम सर महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र नार्वे उपस्थित होते.


यावर्षीच्या युवा महोत्सवांमध्ये एकूण बारा क्रीडा प्रकारा अंतर्गत व सात सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत एकूण 900 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र नार्वे यांनी सांगितले.


यावेळी मनोगत व्यक्त करत असताना फलटण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी श्री सचिन ढोले यांनी विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर ती अभियंत्यांना उपलब्ध संधी याबाबत अवगत करून अभियांत्रिकीचे विद्यार्थी कुठलीही गोष्ट शक्य करू शकतात त्यांनी फक्त प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे असते त्यांना योग्य मार्गदर्शन जर मिळाले तर नवनवीन गोष्टी निर्माण ते करू शकतात. या विद्यार्थ्यांचा क्लासरूम पेक्षा लॅब मध्ये जेवढा वेळ अधिक जाईल तितके चांगले अभियंते आपण घडवू शकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारत हा युवकांचा देश म्हणून समोर येत असतानाच जगातील इतर देशांमध्ये युवकांची संख्या कमी होताना दिसते अशा परिस्थितीमध्ये जगाला विकसित मनुष्यबळ पुरवणारा देश म्हणून भारताची ओळख निर्माण होऊ लागली आहे त्यामुळे जागतिक स्तरावर ती भारतातील अभियंता अनेक उत्तम संधी चालून येत आहेत यासाठी विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घेऊन उत्तम अभियंता बनावे व ही संधी साधावी असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. 


त्यानंतर अध्यक्षीय भाषण करत असताना फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळ, कला या गोष्टींकडेही लक्ष देऊन आपला व्यक्तिमत्व विकास साधावा व देश घडवण्यामध्ये आपला मोलाचा सहभाग द्यावा असे प्रतिपादन केले सहभागी सर्व विद्यार्थी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. 


अभियांत्रिकी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉक्टर नरेंद्र नार्वे यांनी प्रास्ताविक करीत असताना अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रगतीचा विस्तृत अहवाल सादर केला व युवा महोत्सवाबद्दल माहिती दिली.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.