फलटण चौफेर दि १८
राज्य सामाईक परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी प्रवेशासाठी आवश्यक एमएचटी-सीईटी परीक्षेचे मोफत ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय फलटण येथे उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
सदर परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक व माहिती पुस्तिका राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याची सर्व संबंधित विद्यार्थी व पालक यांनी नोंद घ्यावी. सदरचे फॉर्म भरण्यासाठी दिनांक ११ जानेवारी पासून सुरुवात झालेली असून दिनांक १ फेब्रुवारी पर्यंत विद्यार्थ्यांना हे फॉर्म भरता येणार आहेत.ज्या विद्यार्थ्यांना पदवी अभियांत्रिकी साठी प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांना एम एच टी सी इ टी ही परीक्षा देणे गरजेचे असते या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मोफत परीक्षा फॉर्म भरून देणे साठी अभियांत्रिकी महाविद्यालय फलटण यांनी विशेष कक्ष स्थापन केलेला आहे या ठिकाणी उपस्थित राहून विद्यार्थी मोफत फॉर्म भरू शकतात. प्रवेश परीक्षा व प्रवेश प्रक्रिये संदर्भात विद्यार्थ्यांचे शंका निरसन या कक्षामार्फत केले जाईल अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.नरेंद्र नार्वे यांनी दिली.
फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून
फलटणमध्ये सन २०११ साली सुरू झालेले अभियांत्रिकी महाविद्यालय आजमितीस डिग्री इंजिनिअरिंगचे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग,कम्प्युटर इंजिनिअरिंग,इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग,आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डेटा सायन्स इंजिनिअरिंग हे पाच कोर्सेस व डिप्लोमा इंजिनिअरिंग चे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग,सिव्हिल इंजीनियरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हे चार कोर्सेस उपलब्ध आहेत. उत्तम दर्जाचे तंत्रशिक्षण देण्याबरोबरच कौशल्य आधारित अभ्यासक्रम येथे घेतला जात असून फलटण व परिसरातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम यांनी केले.