साखरवाडी गणेश पवार
बँक ऑफ बडोदाच्या वर्धापन दिनानिमित्त सुरवडी ता फलटण शाखेकडून नांदल येथील संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय या ठिकाणी विविध वृक्षांच्या प्रजातींचे वृक्षारोपण व विद्यालयास स्पीकर साऊंड भेट देण्यात आला. यावेळी बँकेचे मॅनेजर अभिजीत घाडगे, रोखपाल दत्तात्रय धायगुडे,शिपाई भीमराव पवार, संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश जगताप, उपशिक्षक महात इलाही, जितेंद्र निंबाळकर, भारत बोराटे, शिवाजी वळवी,अनिल सावंत,रोहन निकम, उपशिक्षिका संध्या तरटे,लिपिक कुणाल राऊत,शिपाई बापूराव सरक,अविनाश पाटोळे विध्यार्थी,विद्यार्थिनी,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

