Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नीरा देवधर प्रकल्पाला केंद्राच्या सीडब्ल्यूसीची मान्यता खा. रणजितसिंह ना. निंबाळकर देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच 'दुष्काळी भाग' हा कलंक कायमचा पुसणार 202320

  


 साखरवाडी(गणेश पवार)

माढा लोकसभा मतदारसंघातील सिंचन प्रकल्प पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी, गृहमंत्री होते. ना. अमित शहा, जलशक्ती मंत्री ना. गजेंद्रसिंह शेखावत, मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या माध्यमातून

मार्गी लावले आहेत. नुकतीच नीरा देवधर प्रकल्पास केंद्राच्या सीडब्ल्यूसीची मान्यता मिळाल्याने प्रकल्प पुर्णत्वास जाण्यास कोणतीच अडचण नसल्याची माहिती खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कोळकी येथील जलसंपदा विभागाच्या विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली  यावेळी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, भारतीय जनता पार्टी प्रदेशचे प्रतिनिधी जयकुमार शिंदे,माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे संयोजक सचिन कांबळे पाटील, युवा नेते लतीफभाई तांबोळी,नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष राजेश शिंदे  उपस्थित होते

खा.रणजितसिंह निंबाळकर म्हणाले, मागील महिन्यात फलटण तालुक्याच्या दृष्टीने महत्वाची कामे मार्गी लागली आहेत. त्यामध्ये बारामती रेल्वे, धोम- बलकवडी बारमाही करण्याचे टेंडर, नीरा देवधरचे टेंडर प्रकाशित करण्यात आले आहे. कृष्णा फ्लॅड डायव्हर्जन प्रकल्पाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. कृष्णेचे पाणी नीरा नदी व बाणगंगा नादिमार्गे जाणार आहे. यामध्ये जवळपास ५ टीएमसी पाणी हे फलटण तालुक्यासाठी आरक्षित करणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचे आभार कोणत्या शब्दात मानू हे कळत नाही त्यांच्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघाचा कायम दुष्काळी भाग हा कलंक कायमचा पुसला जाणार आहे  मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रामधील दुष्काळी भागाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला कृष्णा भीमा स्थिरीकरण हा प्रकल्प संपूर्ण श्रेय हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचेच आहे. विजयसिंह मोहिते-पाटील यांना श्रेय जाऊ नये; म्हणूनच शरद पवार यांनी अनेक वर्ष कृष्णा भीमा स्थिरीकरण हा प्रकल्प रखडवला होता असा आरोपही त्यांनी यावेळी केला.


बाप से बेटा सवाई- प्रल्हादराव साळुंखे पाटील


प्रल्हादराव साळुंखे पाटील म्हणाले, बाप से बेटा सवाई या युक्तीप्रमाणे  खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघात अपेक्षे पेक्षा जास्त कामे केली आहेत   स्व. हिंदुरावनाईक निंबाळकर यांनी पाण्यासाठी लढा उभारला होता त्यावेळी काहींनी त्यांची चेष्टा केली. त्यांनी पाहिलेली रेल्वेसह अनेक स्वप्ने अपेक्षेपेक्षा जास्त काम करुन त्यांचे पुत्र खा. रणजितसिंह यांनी पूर्णत्वास नेली असून भविष्यातील विकास कामांसाठी त्यांना माझ्याकडून शुभेच्छा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.