साखरवाडी (गणेश पवार)
भारतीय जनता पक्षाने 2024 मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी आज 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रमुखांची नियुक्ती केली असून सातारा जिल्ह्यातील फलटण कोरेगाव या विधानसभा मतदारसंघ प्रमुख पदाची जबाबदारी सचिन कांबळे पाटील यांच्याकडे दिली असून 2024 मध्ये या मतदारसंघांमधून तेच भाजपचे उमेदवार असणार का? याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.
सचिन कांबळे हे लोकनेते स्वर्गीय हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांच्या काळापासून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विश्वासू व जवळचे सहकारी म्हणून परिचित आहेत त्यामुळे फलटण विधानसभा मतदार संघातून भाजप त्यांनाच उमेदवारी देणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.