साखरवाडी(गणेश पवार)
श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा 18 ते 23 जून दरम्यान सातारा जिल्ह्यातून जात असल्याने तसेच पालखी सोहळ्यात लाखो भाविक सहभागी होणार असल्याने पालखी जाणारे मार्गावर कोणताही अपघात घडू नये, वाहतूक समस्या निर्माण होवू नये तसेच अनुचीत प्रकार घडू नये याकरिता पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 34 प्रमाणे प्राप्त अधिकारान्वये पालखी सोहळ्यातील वाहनाखेरीज व अत्यावश्यक सेवेतील (पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशामक वाहने) खेरीज करुन इतर सर्व वाहनांना निरा लोणंद पंढरपूर मार्गावर दि. 18 जून ते दि. 23 जून 2023 या कालावधीत खाली नमुद केल्याप्रमाणे प्रवेश करण्यास मनाई करीत आहे.
वाहतुकीमध्ये करण्यात आलेले बदल
दि. 17 जून रोजीचे सकाळी 6.00 वा. पासून ते दि. 21 जून रोजीचे 24.00 वा. पर्यंत फलटण येथून निरा लोणंदकडे येणारी वाहतूक बारामती किंवा वाठार स्टेशन येथून पूण्याकडे शिरगांव घाटातून वळविण्यात येत आहे.
दि. 17 जून रोजीचे रोजीचे सकाळी 6.00 वा. पासून ते दि.20 जून रोजीचे 24.00 वा पर्यंत आदर्की फाटा येथून लोणंदकडे येणारी वाहतूक पालखी सोहळ्यातील येणाऱ्या वाहनाखेरीज वाहनांना बंदी करण्यात येत आहे. तसेच लोणंद येथून फलटणकडे जाणारी वाहतूक आदर्की मार्गे फलटणकडे वळविण्यात येत आहे. फलटण ते लोणंद या मार्गांवरील वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात येत आहे.
दि.21 जून 2023 रोजीचे रोजीचे 00.00 पासून ते दि. 23 जून रोजीचे 16.00 वा. पर्यंत फलटण ते नातेपुते जाणारी वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात येत आहे. नातेपुतेकडून पुणे बाजूकडे जाणारी वाहतूक माळशिरस, अकलूज, बारामती पुल येथून बारामती मार्गे पुण्याकडे वळविण्यात येत आहे. नातेपुतेकडून फलटण मार्गे साताराकडे जाणारी वाहतूक शिंगणापूर तिकाटणे मार्गे दहीवडी - सातारा अशी वळविण्यात येत आहे.. नातेपुतेकडून पुण्याकडे जाणारी वाहतुक नातेपुते - दहीगाव-जांब- बारामती मार्गे पुण्याकडे वळविण्यात येत आहे. नातेपुते-वाई-वाठारकडे जाणारी वाहतूक शिंगणापूर तिकाटणे-शिंगणापुर-जावली-कोळकी- झिरपवाडी-विंचुर्णी-ढवळपाटी - वाठार वळविण्यात येत आहे फाटा मार्गे
दि. 22 जून 2023 रोजी पालखी सोहळा हा फलटण येथून पुढील बरड येथील मुक्कामी सकाळी 6.00 वा. मार्गस्थ होणार आहे. सदर वेळी वाहतुकीची कोंडी निर्माण होवू नये म्हणून पालखीतील वाहने फलटण ते पंढरपूर रोडने बरडकडे जाण्याऐवजी फलटण-दहीवडी चौक- कोळकी - शिंगणापूर- तिकाटणे- वडले-पिंपरद-बरड अशी वळविण्यात येणार आहे.तरी पालखी सोहळ्या दरम्यान पालखी मार्गावर सोहळ्यातील इतर वाहनांनी पर्यायी मार्गाने ये जा करतील याची नोंद घ्यावी.