साखरवाडी(गणेश पवार)
फलटण शहरासह परिसरात आज दि 9 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास झालेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसाने रामनगर येथील फलटण पंढरपूर रस्त्यावरील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाचे छत कोसळल्याची घटना घडली असून यामध्ये 5 ते 6 दुचाकींचे नुकसान झाले आहे दरम्यान सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.