Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

फलटण येथील सुप्रिध्द सर्जन रविंद्र बिचुकले यांचा कॉमरेड्स मॅरेथॅान साऊथ आफ्रिका मध्ये डंका trimac athletics

 



साखरवाडी(गणेश पवार)


 फलटण येथील सुप्रिध्द सर्जन    व Trimac  Athletics कोचिंग टीम चे सदस्य डॉ रविंद्र शिंदे-बिचुकले यांनी साऊथ आफ्रिका येथे नुकत्याच झालेल्या   कॉमरेड्स मॅरेथॅान स्पर्धेत फलटणच्या   डॉबरविंद्र बिचुकले यांनी तालुक्यातील पाहिले कॉमरेड्स मॅरेथॅान फिनीशर होण्याचा  मान पटकावला असून ते गेले 6 महिने Trimac Athletics मध्ये आयर्न मॅन कोच मनोज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रतिष्ठित रेस साठी सराव करत होते.     कॉमरेड्स मॅरेथॅान साऊथ आफ्रिका या वेळेस 87.7 किमी अंतर डाऊन हिल प्रकार असलेमुळे अजुन खडतर होते जगभरातून 25 हजार स्पर्धक तर भारतामधून या स्पर्धेत 400 स्पर्धक सहभागी झालेले होते. डॉ रविंद्र  यांनी  हे अंतर अवघ्या 9 तास आणि 36 मिनिट या विक्रमी वेळामध्ये पूर्ण करत सातारा जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवला . आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन उत्कृष्ट कामगिरी करण्या साठी शारीरिक तसेच मानसिक दृषट्या सक्षम असणे गरजेचे आहे त्यासाठी कोच मनोज चव्हाण यांनी त्यांच्या सरावा सोबतच आहार, व्यायाम मनाचा खडतरपणा कसा असावा तसेच रेस प्लॅन इत्यादी मध्ये बारीक नियोजन करून दिले होते डॉक्टर रविंद्र  यांनी सर्व  गोष्टीचें तंतोतंत पालन करून हे यश संपादन केले, त्याबद्दल त्यांचे सर्व Trimac Athletics चे सहकारी, कोच आणि विविध स्थरामधून  कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.