साखरवाडी(गणेश पवार)
वैष्णव भक्तांचा मेळा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी बरोबर पंढरपूर कडे प्रस्थान झाला आहे दरम्यान तरडगाव येथून पालखी सोहळा काळज , सुरवडी , निंभोरे , वडजल , मलटण मार्गे फलटण शहरात प्रवेश करतो सध्या पुणे पंढरपूर भक्ती महामार्गाचे काम वेगात सुरू आहे या कामात सुरवडी येथील जुने विसावा स्थळ रुंदीकरणात पाडावे लागले नवीन विसावा स्थळ त्वरित बांधून तयार होणे शक्य नव्हते त्यामुळे सुरवडी ग्रामपंचायत व पालखी सोहळा प्रशासन यांनी पूर्वीच्या ठिकाणा पासून काहीं मीटर अंतरावर नवीन तात्पुरते विसावा स्थळ तयार केले आहे
दर वर्षी सुरवडी येथे अर्धा तास पालखी थांबते यावेळी साखरवाडी होळ मुरूम नांदल परिसरातील भक्त दर्शनासाठी येतात निंभोरे येथे पालखीच्या विसावा तळावर तयारी पूर्ण झाली आहे सखल भागात मुरूम व खडी टाकण्यात आली आहे या ठिकाणी नागरिक दर्शनासाठी रांगा करतात त्यामुळे दर्शन रांगेची व्यवस्था केली आहे या परिसरात यात्रेचे स्वरूप येत असल्याने विसावा स्थळ व परिसर स्वच्छ करण्यात आला आहे
सुरवडी विसावा स्थळ पुणे पंढरपूर महामार्गाच्या रुंदीकरणात काढावे लागले होते त्यामुळे पालखी विसाव्यासाठी सुरवडी येथे नवीन ओटा बांधला आहे ही या वर्षी पुरती केलेली सुविधा असली तरी पुढच्या वर्षी नवीन विसावास्थळ बांधण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले या वर्षी देखील पालखी सोहळ्यासाठी आम्ही त्याच ऊर्जेने सक्षमपणे उभे आहोत असे सुरवडी गावचे ग्रामविकास अधिकारी एस आर राऊत यांनी सांगितले