साखरवाडी गणेश पवार
विडणी ता फलटण गावाच्या हद्दीमध्ये संत सावतामाळी चौकाच्या पुढे दिनांक 5 जून रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास संशयित राजेंद्र संपत शिर्के, सुरेश संपत शिर्के, धनंजय संपत शिर्के तिघेही राहणार विडणी यांनी दारू पिऊन काही कारण नसताना फिर्यादीला जाती वाचक शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तिघां विरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस करीत आहेत