खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाने तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतच्या इमारत बांधणीची स्थगिती उठली sthagiti uthali
साखरवाडीची वार्ताJune 06, 2023
0
साखरवाडी गणेश पवार
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाने फलटण तालुक्यातील नऊ ग्रामपंचायत इमारत बांधणीवरील स्थगिती उठली असून महाराष्ट्र शासनाच्या 'स्व बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतून' इमारत बांधणीसाठी मागील काळात प्रशासकीय मान्यता मिळाली होती मात्र नंतर या बांधकामांना स्थगिती आदेश मिळाले होते याबाबत खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 15 नोव्हेंबर 2022 रोजी पत्र लिहून ही स्थगिती उठवण्याची विनंती केली होती त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे यांनी ही स्थगिती उठवल्याने सातारा जिल्हा परिषदेने दिनांक 29 मे 2023 रोजी गटविकास अधिकाऱ्यांना पत्र लिहून ग्रामपंचायत इमारत बांधकामाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले असून त्यानुसार फलटण तालुक्यात घाडगेवाडी, शेरेचीवाडी (ढवळ), बोडकेवाडी, कांबळेश्वर, ताथवडा, राजाळे, निंभोरे,टाकळवाडा व मानेवाडी या ग्रामपंचायत इमारतींच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला असून याबाबत या गावांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे आभार मानले