विविध परीक्षांमध्ये धुळदेव हायस्कूलचे यश dhul dev highschool
साखरवाडीची वार्ताJune 06, 2023
0
विडणी - (योगेश निकाळजे )
रयत शिक्षण संस्थेचे, श्रीमान शेठ धन्यकुमार रतनचंद गांधी विद्यालय धुळदेव, हे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला वाव देणारे विद्यालय आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या मार्च 2023 एसएससी बोर्ड परीक्षेमध्ये या विद्यालयाचा निकाल 96.8% इतका लागलेला आहे. विद्यालयात आकाश धनंजय राऊत ( 92.40% )इतके गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. सिद्धी संतोष सोनवलकर ( 91.80%) द्वितीय , ओंकार महादेव गोफणे ( 85.20% )व संचिता संतोष सोनवलकर ( 85.20 ) यांनी विभागून तृतीय क्रमांक मिळवले आहेत.
त्याचप्रमाणे सन 2022 23 या वर्षांमध्ये विद्यालयाने इयत्ता 5 वी व 8 वी स्कॉलरशिप, एन.एम.एम.एस. परीक्षा, सैनिक स्कूल परीक्षा, रयत ऑलंपियाड या स्पर्धा परीक्षामध्ये एकूण 23 विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत. कुस्ती, ग्रापलिंग, कबड्डी आणि टेनिक्वाइट अशा क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यालयाने उत्तम यश मिळवलेले आहे. धुळदेव पंचक्रोशीतून या यशाबद्दल विद्यालयाचे कौतुक होत आहे. रयत शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, जनरल बॉडी सदस्य, स्थानिक स्कूल कमिटी, धुळदेव ग्रामपंचायत, मुख्याध्यापक व सर्व सेवकवर्ग यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.