साखरवाडी (गणेश पवार)
काही दिवसापूर्वी कोल्हापूर व सांगलीत दिवसाढवळ्या चोरट्यांनी ज्वेलर्स दुकानावर दरोडावर टाकून करोडो रुपयांचे दागिने लंपास केल्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती त्यामुळे सराफ दुकानदारांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे त्यामुळे फलटण सराफ बाजारपेठेमध्ये व्यापारी व खरेदीदार यांच्यामध्ये सुरक्षेतेची भावना निर्माण होण्यासाठी फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या संकल्पनेतून फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीतील सराफी दुकानदार ,व्यापारी खरेदीदार यांच्या सुरक्षेसाठी फलटण शहर पोलीस ठाण्यामधील सशस्त्र पोलीस अंमलदार यांची सराफी बाजारपेठ परिसरात सशस्त्र पायी पेट्रोलिंग दि. 10 सशस्त्र पायी पेट्रोलिंगची अंमलबजावणी सुरू केली आहे. कोणतीही चोरी किंवा इतर कोणतीही अनुचित घटना घडल्यास घाबरून न जाता, तात्काळ फलटण शहर पोलीस ठाण्याचे खालील दूरध्वनी वरती संपर्क कराण्याचे आवाहन फलटण शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे
लँडलाईन क्रमांक 02166222333
पो. नि. पाटील -9372239136
पो. उप. नि. शिंदे -7447555007