साखरवाडी(गणेश पवार)
भिलकटी येथे दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थी व पालक यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी भिलकटी गावातील दहावी व बारावी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेले विद्यार्थी व पालक उपस्थित होते. भिलकटी गावचे पोलीस पाटील शांताराम काळेल यांच्या वतीने दरवर्षी गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात येतो. यावर्षी बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेले श्रीजय राजेंद्र चोरमले, धनश्री संतोष मिरगे, वेदांत शशीकांत डिसले, पंकज रामचंद्र मोरे, अनामिका सतिष गोरे, साक्षी नवनाथ गोडसे, निकिता अतुल काळुखे, श्रद्धा आत्माराम काळुखे, विकास राजेंद्र भंडलकर, अंशुमन सुनील ननावरे, प्रतिक सुहास कांबळे तर दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या चैतन्य सतिष गोरे, ओम रामदास ननावरे, गणेश प्रविण बाड, अभिजित प्रकाश गोडसे,प्रांजल संजय घुले या विद्यार्थ्यांचा पालकांसमवेत सन्मान करण्यात आला.
सत्कार समारंभाला उत्तर देताना विद्यार्थ्यांनी आयोजकांचे तसेच विद्यार्थ्यांना आशीर्वाद देण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित असनारे जेष्ठ नागरिक यांचे आभार मानले. या कार्यक्रमात भिलकटी गावातील निवृत्त कृषी अधिकारी श्रीकांत डिसले, सरपंच सौ. सविता पवार, जनार्दन कांबळे, कैलास भंडलकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा पालकांसमवेत सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी पोलिस पाटील शांताराम काळेल यांच्या मार्गदर्शनाखाली शशीकांत डिसले, नागेश भंडलकर, गणेश ताकवले, राजेंद्र चोरमले, नवनाथ कदम, भारत कांबळे, दादासो मोहिते यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भिलकटी गावचे पोलीस पाटील शांताराम काळेल यांनी विद्यार्थ्यांनी स्वतः ची व कुटुंबाची प्रगती करण्यासाठी शिक्षण हा एकमेव पर्याय असल्याचे सांगितले. आजमितीस सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध असुन विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. सर्वच प्रवेश प्रक्रिया सुरू होत असून विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आवश्यक कागदपत्रे काढून घ्यावीत असे आवाहन केले.
यावेळी त्यांनी उपलब्ध शैक्षणिक संधी व शासकीय तथा खाजगी शिष्यवृत्ती योजना याबाबत विद्यार्थ्यांना अवगत केले व उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.