साखरवाडी गणेश पवार
महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांचा आज दिनांक 8 रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग पाहणी नियोजित दौरा असून या दौरा वेळी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास निरा, लोणंद व तरडगाव या ठिकाणच्या पालखी तळांची पाहणी केल्यानंतर सुरवडी तालुका फलटण येथील तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांच्या 'मनीषाई' या निवासस्थानी त्यांनी प्रल्हादराव साळुंखे पाटील यांची सदिच्छा भेट घेतली
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, पोलीस प्रमुख समीर शेख, फलटणचे विभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, फलटण शहर चे पोलीस निरीक्षक शंकर पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संजय कदम, पंचायत समितीचे माजी सदस्य धनंजय साळुंखे पाटील, सुरवडीचे माजी सरपंच जितेंद्र साळुंखे पाटील, आरकेसीचे प्रमुख आर के चव्हाण फलटण तालुका व शहरातील भाजपचे पदाधिकारी व सुरवडीतील ग्रामस्थ उपस्थित होते