![]() |
संग्रहित चित्र |
साखरवाडी(गणेश पवार(
बुधवारी सायंकाळी बैलगाडी शर्यतीदरम्यान अपघात होऊन शर्यतीवेळी निकाल रेषेजवळ असलेल्या एका युवकाच्या अंगावर बैलगाडी गेल्याने त्याचा मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी, नागठाणे येथील जय हनुमान तालीम संघाच्यावतीने भव्य महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी शर्यतीवेळी पळणारी एक बैलगाडी निकाल रेषेजवळ असणाऱ्या एका युवकाच्या अंगावर गेली. बैलगाडीचे चाक युवकाच्या डोक्यावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला.
या अपघातानंतर स्थानिकांनी त्याला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्या युवकाचा मृत्यू झाला. संबंधित युवक हा मूळचा पंजाबमधील रहिवासी आहे. तो सध्या बोरगावमध्ये वास्तव्यात होता. या ठिकाणीच तो बांधकाम कामगार म्हणून काम करत होता. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनीही तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची नोंद बोरगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.