साखरवाडी(गणेश पवार)
दि.१४ फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या ६१व्या वाढदिवसानिमित्त निरगुडी गावातील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयास ६१पुस्तकांनचा संच भेट देण्यात आला.
वाचन संस्कृती टिकवून धरण्यासाठी वाचनाची आवड मुळातूनच निर्माण होणे आवश्यक आहे. मुलांमध्ये वाचन वेड उत्पन्न व्हायचे असेल तर तशी परिस्थिती त्यांच्याभोवती निर्माण होणे गरजेचे आहे, ही गरज ओळखून निरगुडी गावातील युवा नेते ग्रामपंचायत सदस्य सत्यजित सस्ते, प्रगतिशील शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते, विठृल सस्ते, यांनी श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या ६१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रंथालयास पुस्तके भेट देण्यात आली व ज्योतिर्लिंग विकास सोसायटी चेअरमन पदी अमोल दशरथ सस्ते यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी विठ्ठल सस्ते म्हणाले, आजच्या धकाधकीच्या जीवनात मोबाईल फोन व टि.व्ही यांसारख्या उपकरणांच्या दुनियेत मुले गुंतली आहेत. माणसाचे जीवन फुलविण्यात वाचनाचा महत्त्वाचा वाटा असतो. वाचन छंद बालपणापासून रुजविण्यासाठी आम्ही पुस्तके भेट दिली
यावेळी उपस्थित निरगुडी ग्रामपंचायत उपसरपंच श्री महावीर बनसोडे, ग्रामपंचायत सदस्य सत्यजित सस्ते, माजी सरपंच चंद्रकांत सस्ते, सामाजिक कार्यकर्ते,धनंजय लकडे, महेंद्र गोरे,मनोज चव्हाण, किशोर सोनवणे, नाना सोनवणे, संतोष जगताप, अंकुश गोरे, साहेबराव सोनवणे, जगन्नाथ सोनवणे आदी उपस्थित होते.