सुरवडी ग्रामपंचयतचा 'पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला सन्मान पुरस्कार' श्रीमती प्रमिला वाघ यांना प्रदान pradan
साखरवाडीची वार्ताJune 01, 2023
0
साखरवाडी(गणेश पवार)
महाराष्ट्र शासनाचा महिला व बालकल्याण महामंडळ अंतर्गत ग्रामपंचायतस्तरीय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला सन्मान पुरस्कार सुरवडी तालुका फलटण ग्रामपंचायत च्या वतीने गावातील अंगणवाडी शिक्षिका श्रीमती प्रमिला दशरथ वाघ यांना प्रदान करण्यात आला श्रीमती प्रमिला वाघ या गावातील अंगणवाडीमध्ये सतत नवीन उपक्रम राबवून लहान मुलांच्यामध्ये विविध कलागुण विकसित करीत असतात यावेळी ग्रामसेवक एस आर राऊत, उपसरपंच विजय खवळे, माजी उपसरपंच बाळासो जगताप,माजी सदस्य संतोष साळुंखे,राजेंद्र जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.