साखरवाडी गणेश पवार
माण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी सचिव संशयित रमेश रामभाऊ जगदाळे (रा. राणंद ता. माण) यांच्या विरोधात पैशाचा अपहार केल्याप्रकरणी दहिवडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून तिथून मिळालेल्या अधिक माहितीनुसार
दिनांक ९ मार्च२०२१ ते दिनांक ३१ मार्च २०२२ या कालावधीत तत्कालीन सचिव यांनी जाफर नदाफ (रा. आंधळी ता.माण) यांचेकडुन भुखंड डिपॉझीट म्हणुन ४५ हजार रुपये,श्रीमती शकुंतला सुर्यकांत काटकर (रा. दहिवडी) यांचेकडुन लायसन्स फी, भुखंड भाडे, बिगर शेती याकरीता म्हणुन ९ हजार ६०० रुपये, शितल कांतीलाल गांधी (रा. दहिवडी ता. माण) यांचेकडुन भुखंड ट्रान्सफर फि करीता १० हजार रुपये,सुभाष बाळकृष्ण उरवणे (रा. राणंद ता.माण) यांचेकडुन मार्केट फि करीता ३ हजार, शकुंतला सुर्यकांत काटकर (रा. दहिवडी) यांचेकडुन लायसन्स फि, भुंखंड भाडे, बिगरशेती या करीता म्हणुन ९ हजार, तातोबा बापु मोरे (रा. लोटेवाडी म्हसवड) यांचेकडुंन लायसन्स फि, भुखंड भाडे, बिगरशेती याकरीता म्हणुन १०हजार ४५० रुपये,शहाजी साहेबराव सुर्यवंशी (रा. म्हसवड) यांचेकडुन गाळाडिपॉझीट याकरीता म्हणुन ५० हजार रुपये अशी एकूण १ लाख ३७ हजार रुपये रक्कम बाजार समितीत जमा न करता सदर रक्कमेचा अपहार केल्याची फिर्याद लेखापरीक्षक रमेश किसन बागुल रा शुक्रवार पेठ सातारा यांनी दिली असून पुढील तपास सपोनी अक्षय सोनवणे करीत आहेत