साखरवाडी(गणेश पवार)
साखरवाडी ता फलटण येथील साखरवाडी बागायतदार संघाची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली आज दि 1 जून रोजी चेअरमन व व्हा चेअरमन निवडी सुद्धा बिनविरोध पार पडून चेअरमन पदी हिरालाल साहेबराव पवार यांची तर व व्हाईस चेअरमनपदी वसंतराव लक्ष्मणराव जाधव (हवालदार) यांची बिनविरोध निवड झाली सदर निवडी बद्दल त्यांचे तालुक्याचे जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी पुष्पहार व श्रीफळ देऊन अभिनंदन केले यावेळी फलटण पंचायत समितीचे माजी सदस्य धनंजय साळुंखे पाटील, साखरवाडी चे तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश नाना भोसले, साखरवाडीचे उपसरपंच अक्षय रुपनवर,बाळासाहेब कुचेकर,हणमंत भोसले,मनोज भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.