साखरवाडी गणेश पवार
संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यात आज दुपारी 1.40 वाजता मोठ्या जल्लोषात आगमन झाले यावेळी येथील दत्तघाट येथे माऊलींच्या पादुकांचा भक्तिमय वातावरणात निरा स्नान सोहळा लाखो वारकरी व भक्तांच्या साक्षीने पार पडला
दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याने पुणे जिल्ह्यातील प्रवास संपवून सातारा जिल्ह्यामध्ये आगमन केले यावेळी सातारा जिल्हा परिषद, सातारा पोलीस, पंचायत समिती खंडाळा,आरोग्य विभाग व पाडेगाव ग्रामपंचायत यांनी दत्तघाट येथे वारकऱ्यांच्या सोयीसाठी विविध उपाययोजना केल्या होत्या तसेच सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता दत्त घाट निरासन पादुकांना निरास्नान वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून महाबळेश्वर ट्रेकर्स व खंडाळा रेस्क्यू टीम या ठिकाणी तैनात करण्यात आली होती