सातारा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत फलटण येथील बी.सी.ई.बी.सी. मुलीचे शासकीय वसतीगृह जाधवाडी ता. फलटण येथील शासकीय वसतिगृहात 2023-2024 या शैक्षणीक वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली असून सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार व जाती संवर्गाच्या आरक्षणानुसार इ.8 वी पासून पुढील शिक्षणासाठी प्रवेश दिला जाणार आहे. तरी इच्छुकांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन वसतिगृहाच्या अधिक्षीका यांनी केले आहे.