मुरूम तालुका फलटण येथे वादळी वाऱ्याने शेतकऱ्याचे नुकसान nuksan
साखरवाडीची वार्ताJune 05, 2023
0
साखरवाडी(गणेश पवार)
मुरूम तालुका फलटण येथे रविवार दिनांक चार रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सुटलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे येथील शेतकरी बाळू रामचंद्र शिंदे यांच्या शेतातील सौर पंपाचे स्ट्रक्चर व सोलर प्लेट्स उन्मळून पडल्याने सुमारे 75 हजाराचे नुकसान झाले असून याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी रविवार दिनांक 4 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मुरूमसह परिसरामध्ये सुटलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उंदळून पडल्याची घटना घडल्या असून मुरूम येथील शेतकरी बाळू शिंदे यांच्या शेतातील गट 29/5/ब या शेतातील सौर कृषी पंपाचे स्ट्रक्चर या वादळी वाऱ्याने उन्मळून पडून त्यावरील 6 सोलरच्या प्लेट्स फुटून सुमारे 75 हजार रुपयांचे नुकसान झाले असून सदर घटनेचा पंचनामा तलाठी संदीप कुंभार यांनी केला आहे.