'हॉटेल जॅक्सन इन्स' यांच्याकडून पर्यावरण दिनानिमित्त सुरवडी येथे वृक्षारोपण vruksharopan
साखरवाडीची वार्ताJune 05, 2023
0
साखरवाडी(गणेश पवार)
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निंभोरे ता येथील हॉटेल जॅक्सन इन यांच्याकडून सुरवडी तालुका फलटण येथील न्यू इंग्लिश स्कूल व भवानी माता मंदिर परिसरामध्ये वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सुरवडी गावच्या सरपंच शरयू साळुंखे पाटील, पोलीस पाटील संतोष पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी हॉटेल जॅक्सन इन्सचे शैलेश राजध्यक्ष, Arts रंजन, अभय मोरे, हरिदास ठोंबरे, सुरवडी ग्रामपंचायतचे माजी सदस्य रमेश सातपुते,दीपक माडकर, ग्रामपंचायतचे कर्मचारी सूरज घारगे, अमोल गोरे, गणेश जाधव व ग्रामस्थांची उपस्थिती होती