साखरवाडी गणेश पवार
येळेवाडी तालुका माण येथे दिनांक 5 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास वृद्ध महिलेचा चाकूचा धाक दाखवून घरातील रोख रकमेसह शेळी चोरणाऱ्या दोन युवकांना दहिवडी पोलीस पोलिसांनी एका तासात माळेगाव तालुका बारामती येथून अटक केली असून दहिवडी पोलीस स्थानकातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दिनांक 5 रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास येळेवाडी ता माण येथील फिर्यादी श्रीमती सिधु सर्जेराव विरकर (वय 50) या वृद्ध महिलेला संशयित योगेश पोपट साळुंखे व रवींद्र गजानन साळुंखे दोघेही राहणार माळेगाव तालुका बारामती यांनी काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर येऊन मला चाकूचा धाक दाखवत घरातून रोख रक्कम 2 हजार रुपये व दारासमोर बांधलेली 27 हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची गाभण शेळी जबरीने चोरून नेल्याची फिर्याद दिली होती याबाबत दहिवडी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून अवघ्या एका तासात दोन्ही संशयित आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांच्या ताब्यातून दुचाकी व चोरी केलेली शेळी व रोख रक्कम असा एकुण 1 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे,पोलीस उपनिरीक्षक गुलाब दोलताडे, सहाय्यक फौजदार प्रकाश हांगे,पोलीस नाईक रवींद्र बनसोडे, पोलीस नाईक रवींद्र खाडे,पोलीस कॉन्स्टेबल महेश सोनवलकर वपोलीस नाईक प्रमोद कदम यांनी सहभाग घेतला.