साखरवाडी (गणेश पवार)
शेंदुरजणे ता वाई येथील दोन वर्षाची चिमुरडी प्रशिका अक्षय जाधव या अवघ्या दोन वर्षाच्या चिमुरडीने 18 मिनिटे 30 सेकंदात 196 वस्तू ओळखून जागतिक विक्रम केला असून तिची नोंद वर्ल्डवाइल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे दि 14 एप्रिल 2023 रोजी मनमाड, येथे झालेल्या स्पर्धेत प्रशिका ने हा विक्रम केला. प्रशिकाचे आई-वडील हे दोघेही उच्चशिक्षित असून प्रशिक्षकाची आई कलिका अक्षय जाधव यांचे माहेर निंभोरे ता फलटण असून सध्या त्या पुणे येथील आयटीमध्ये कंपनी मध्ये इंजिनिअर पदावर काम करीत आहेत तर वडील अक्षय अनिल जाधव हे रिलायन्स कंपनीत मेकॅनिकल इंजिनियर म्हणून काम करतात प्रशिकाच्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.