साखरवाडी(गणेश पवार)
सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या आगामी लोकसभा,विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका संदर्भात फलटण तालुक्यातील जि.प. गटांच्या आढावा बैठका तरडगाव,सासवड (झणझणे) साखरवाडी,तिरकवाडी विडणी,आसू,फरांदवाडी या विविध ठिकाणी संपन्न झाल्या या प्रसंगी प्रदेश काँग्रेसचे जिल्हा प्रभारी श्रीरंग(नाना) चव्हाण, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव,जिल्हा सेवादलाचे अध्यक्ष प्रतापसिंह देशमुख, जिल्हा सरचिटणीस श्री.नरेश देसाई, जिल्हा संघटक सर्जेराव पाटील,फलटण तालुका काँग्रेस चे अध्यक्ष महेंद्रभैय्या सूर्यवंशी (बेडके),कार्याध्यक्ष अमीरभाई शेख,शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पंकज पवार, फलटण तालुका सेवा दल अध्यक्ष शिवाजीराव घोरपडे, अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष अल्ताफभाई पठाण,जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस गंगाराम रणदिवे,युवक अध्यक्ष अजिंक्य कदम,नौशादभाई पठाण,मंगेश कडाळे उपस्थित होते.याप्रसंगी देशात आणि राज्यात भाजप सरकारकडून होणाऱा सत्तेचा गैरवापर,फसलेली नोटबंदी,शेतमालाला दर नाही,वाढती बेरोजगारी यासारख्या अनेक बाबतीत सरकार अपयशी ठरले असून याबाबत लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मोदी@9 यासारख्या कार्यक्रमांमधून जनतेची दिशाभूल करण्याचे काम चालू आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनता पुन्हा एकदा काँग्रेस बरोबर जोडली जात आहे त्याचाच परिणाम कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांचा विजय,कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला दैदीप्यमान विजय मिळाला येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा काँग्रेसला नक्कीच मिळेल यामुळे पक्षाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांपर्यंत जाऊन आपली भुमिका मांडून जनतेचा विश्वास संपादन करुन पुन्हा एकदा सर्वसामान्यांना आपले वाटेल असे काँग्रेसचे सरकार आले पाहिजे या साठी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली यावेळी तालुक्यातील विविध गावातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.