साखरवाडी( गणेश पवार)
फलटण शहर व तालुक्यात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९८-वी जयंती महोत्सव मोठ्या उत्सवात व थाटामाटात साजरी करण्यात आली. या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने गेली ३ दिवस फलटण शहरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये प्रामुख्याने फलटण येथील अनंत मंगल कार्यालयांमध्ये महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये तब्बल १६० रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्याचबरोबर शिवशाही व होळकरशाहीचे गाढे अभ्यास प्राध्यापक यशपाल भिंगे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
तसेच शुक्रवार दिनांक 2 जून रोजी मोटर सायकल बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यार आलेला मोठ्या उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभला.
यानंतर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची भव्य दिव्य मिरवणूक सायंकाळी ठीक ७ वाजता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकामधून सुरु करण्यात आली.
या मिरवणुकीचा प्रारंभ महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर यांच्या शुभहस्ते नारळ फोडून करण्यात आला. याप्रसंगी फलटण नगरपरिषदेचे जेष्ठ नगरसेवक समशेरसिंह नाईक निंबाळकर, ऋषिकांत नाईक निंबाळकर, श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य सचिन भैय्या सुभाषराव बेडके, फलटण तालुका दूध संघाचे माजी चेअरमन प्राध्यापक भीमदेव बुरुंगले श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन तथा जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष पै. बजरंग खटके, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, महात्मा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. दादासाहेब चोरमले, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महादेवराव पोकळे, पै.संजय देशमुख, रा.स.प.चे जिल्हाध्यक्ष खंडेराव सरक, युवा रासपचे जिल्हाध्यक्ष संतोष ठोंबरे इ. मान्यंवर याप्रसंगी उपस्थित होते.
सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. जयंती उत्सव कमिटीच्या वतीने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, समशेर सिंह नाईक निंबाळकर, सचिन बेडके व ऋषी नाईक निंबाळकर या उपस्थित मान्यंवराचे फेटा, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी श्रीमंत रामराजे म्हणाले आहेत की, महाराष्ट्रातील चौंडी या छोट्याशा गावी जन्म झालेल्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा होळकर घराण्यातील मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी म्हणजेच खंडेरावांशी विवाह झाला. खंडेरावांच्या मृत्यू पश्चात होळकर घराण्याच्या राज्यकारभाराची संपूर्ण जबाबदारी अहिल्यादेवी होळकर यांनी स्वीकारली. एवढ्यावरच पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर थांबल्या नाहीत तर
होळकर घराण्याचा राज्यकारभार करताना राज्यातील लोकांच्या समस्या जाणून घेत, त्या तत्काळ सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. राज्यातील सामाजिक विषमता, अस्पृश्यता निवारण्यासाठी तसेच, स्त्री- पुरुष समानता, अनिष्ट रूढी परंपरांचा बिमोड करण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले.
राज्याच्या हिताची निर्णय घेत असताना आपली संस्कृती टिकावी यासाठी, त्यांनी देशभरात अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. स्त्रियांना डोळ्यासमोर घेत नदीवरील घाट तसेच, धर्मशाळा आश्रम शाळा उभारल्या. होळकर साम्राज्यातील जनतेमध्ये धर्मनिरपेक्षता, स्वतंत्र आणि समता, बंधुता यांची बीजे त्यांनी रोवली.
होळकर यांच्या कर्तबगार पराक्रमी शूर पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमित्त मी कोटी कोटी अभिवादन करतो असेही शेवटी श्रीमंत रामराजे यांनी म्हटले आहे.
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त निघालेल्या भव्य- दिव्य मिरवणुकीमध्ये घोडे व घोड्यावर स्वार झालेल्या रणरागिणी अहिल्या, झांज पथक, मुलींचे लेझीम पथक हलगी पथक, आकर्षक असा लाईटचा देखावा, तुतारी पथक, महाराष्ट्रातील नामांकित भव्य-दिव्य ओंकार डी. जे. अशा अनेक वाद्यासह खास करून धनगरी गजी नृत्य मिरवणुकीचे लक्ष वेधून घेत होते. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकामध्ये निघालेली मिरवणूक फलटण शहराच्या मुख्य मार्गावरून म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक महावीर स्तंभ राजे उमाजी नाईक चौक गजानन चौक येथून महात्मा फुले चौकामध्ये मिरवणुकीचा शांततेच्या मार्गाने समारोप करण्यात आला.
मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव कमिटीचे उपाध्यक्ष रामभाऊ ढेकळे, कार्याध्यक्ष बजरंग गावडे, जयंती महोत्सव कमिटीचे समन्वयक नानासाहेब ईवरे, रा.स.प.चे लक्ष्मण शेंडगे, पै. अभिजीत जानकर, पोलीस पाटील संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष हनुमंतराव सोनवलकर, दादासाहेब महानवर, अवि सुळ, ऋषिकेश बिचुकले, अजित शिनगारे, पै. खंडेराव भिसे, पै. भास्कर ढेकळे, आदित्य चोरमले, अजिंक्य चोरमले, सुमित उर्फ बाबु चोरमले अनिल चोरमले, संदिप चोरमले, लहु चोरमले, पंकज सोनवलकर,अक्षय सोनवलकर,अमोल पोकळे, निलेश बुरुंगले, पै.विजय गोफणे इत्यादी मान्यवर मंडळींनी मोलाचे सहकार्य केले.