साखरवाडी(गणेश पवार)
दुर्गराज रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी गडावर अनेक धार्मिक शास्त्रशुद्ध पूर्व विधी पार पडले यामध्ये राज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वसंध्येला, कलश पूजन, गड पूजन, तोरण बांधणी, गडदेवतांचे अभिषेक व पूजा . या विधी दरम्यान साखरवाडी (५ सर्कल) या ठिकाणचे शिवभक्त अमोल खेसे- देशमुख. यांना कलश पूजनाचे सौभाग्य लाभले. जालना जिल्हा शिवराज्याभिषेक महोत्सव सोहळा. प्रमुख आयोजक डॉ.श्रीकांत पाटील. याकरिता दुर्गराज रायगडावरील पवित्र माती कलश यात्रा दुर्गराज रायगड ते जालना या यात्रेचा शुभारंभ अमोल खेसे - देशमुख यांच्या शुभहस्ते रायगडावर झाला. कलश यात्रा संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये जाणार आहे.
राज सदरेवरील मेघडंबरी महाराजांच्या मूर्तीस शास्त्रशुद्ध पद्धतीने मंत्रघोष यांच्यासह शेला अर्पण करण्याचा मान मिळाला. अमोल खेसे यांच्या शिवरायांची गारदेने संपूर्ण रायगड मंत्रमुग्ध झाला त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी विकास जगताप, चेतन शिवतरे,रोहन कदम हे होते.